प्रवाशी, वाहनचालकांकडून समाधान
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग-रेवदंडा मार्गावर कुरूळ येथे पडलेल्या खड्ड्यांमध्ये एमएसआरडीसीकडून जेएसडब्ल्यूकडून बाहेर टाकण्यात येणाऱ्या स्लॅगचा वापर करून डागडुजी केली होती. परंतु, यामुळे येथे धोकादायक स्तिथी निर्माण झाली होती. याविरोधात कृषीवलने आवाज उठवत “रसत्यावरील खड्डे ‘स्लॅग’ने भरण्याचा ‘जावईशोध” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करताच रातोरात येथील स्लॅग उचलण्यात आले. त्यामुळे जनतेचा आवाज बनून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘कृषीवल’चे सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
अलिबाग-रेवदंडा रस्त्यावरील खड्डे रेडिमिक्स डांबराच्या साहाय्याने बुजवणे गरजेचे असताना स्लॅगचा वापर करून खड्डे बुजवण्याचा अजब प्रकार एमएसआरडीसीने केला होता. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी स्वरांना गाडी चालवणे कठीण झाले होते. अनेक दुचाकी स्लिप देखील झाल्या. याविरोधात जनतेतून संताप व्यक्त होत होता. दरम्यान, ‘कृषीवल’ने जनतेचे प्रश्न लावून धरत या अजब कारभाराबाबत एमएसआरडीसीला जाब विचारला. याची तात्काळ दखल घेत रस्त्यावरील स्लॅग रातोरात उचलण्यात आली. याबाबत ‘कृषीवल’चे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.







