। पनवेल । वार्ताहर ।
विधान सभेची निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत. ऑक्टोंबर हिट ऐवजी निवडणुकीमुळे राजकीय वातावरण गरम होत आहे. पनवेलमध्ये तिरंगी लढत होत असून शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना मिळालेली निशाणी शिट्टीने कामोठ्यात सर्वत्र जोर धरला आहे. यावेळी, ‘आता बदल हवा, पनवेलचा आमदार नवा’ ही टॅग लाईन जोरदार चालत आहे.
शेकाप व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळाराम पाटील यांनी कमोठ्यातील प्रत्येक सेक्टरमध्ये दौरे केले असून त्यांच्या चौक सभेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एकंदरीत शेकाप आणि महाविकास आघाडीने कामोठ्यातील प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे. यावेळी काँग्रेस नेते सुदाम पाटील, आर.सी. घरत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सतीश पाटील आदी नेते पूर्ण ताकद लावत आहेत. यात प्रामुख्याने मा. नगरसेवक प्रमोद भगत, शंकर म्हात्रे, सखाराम पाटील, अल्पेश माने, गौरव पोरवाल, सुरेश खरात, कुणाल भेंडे, सचिन भेंडे, सचिन झनझणे, काँग्रेसचे जयेश लोखंडे, सूरज नेरुटकर, राष्ट्रवादी शरद पवार गट सूरदास गोवारी, चंद्रकांत नवले, महेंद्र पाटील, दत्तात्रय औटी आपचे शरद पडूळकर आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकदिलाने काम करत आहेत.