एक्स्प्रेसवे चे स्पीड वाढणार

ताशी 140 किमी. वेगाचा प्रस्ताव
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील एक्स्प्रेस वे वरील वाहनांचे स्पीड आणखी वाढले जाणार आहे.याबाबत बोलताना केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, ते एक्स्प्रेस वे वरील वाहनांच्या वेग मर्यादेत वाढ करून ती 140 किलोमीटर प्रतितास करण्याच्या बाजूने आहेत. तसेच, यासंबंधी लवकरच संसदेत विधेयक देखील सादर केले जाणार आहे. त्यांनी सांगितले की विधेयकाचा उद्देश विविध श्रेणींमधील मार्गांवरील वाहनांच्या वेग मर्यादेत बदल करणे आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, वेगाबद्दल अशी धारणा आहे की, जर कारचा वेग वाढला तर दुर्घटना होईल. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह – 2021 मध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, माझे वैयक्तिक मत आहे की एक्स्प्रेस वे वर वाहनांची वेग मर्यादा वाढवून 140 किलोमीटर प्रतितास केली पाहिजे.
तसेच, चार लेन असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर वेग मर्यादा कमीत कमी 100 किलोमीटर प्रतितास असली पाहिजे, तर दोन लेन असलेल्या मार्गांवर आणि शहरी रस्त्यांसाठी वेग मर्यादा क्रमश: 80 किलोमीटर प्रतितास आणि 75 किलोमीटर प्रतितास असली पाहिजे. भारतात वाहनांच्या वेग मर्यादेचा मापदंड निश्‍चित करणं हे एक मोठं आव्हान आहे. असंही यावेळी गडकरींनी बोलून दाखवलं.

Exit mobile version