। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी तालुक्यातील पानवल येथे सोमवारी (दि.2) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याची साईडपट्टी खचल्याने एसटी कलंडल्याची घटना घडली आहे. ही एसटी बस रिकामी असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी चालक आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-20-बीएल-4027) घेउन रत्नागिरी ते पानवल जात होता. ही एसटी ब्राम्हणवाडीच्या पुढे गेली असता पावसामुळे येथील रस्त्याची साईडपट्टी कमकूवत झाली होती. एसटी बस या साईडपट्टीवरून जात असता ती खचून बस कलंडली. यावेळी सुदैवाने बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसचे, चालक आणि वाहकही बचावल्याने पुढील अनर्थ टळला. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.