शिक्षक संतोष गावंड यांच्या प्रयत्नातून मिनी तारांगण
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
नभांगणात रात्रीच्या वेळी चमचमणार्या, गडद अंधारातही चमकून दिसणार्या छोट्या, मोठ्या तारा, तारकांचे सर्वांनाच एक कुतुहल असते. विशेष करुन विद्यार्थ्यांना या तार्यांविषयी वाटणारी उत्सुकता पाहून वायशेत जिल्हा परिषदेतील शिक्षक संतोष गावंड यांनी शाळेमध्ये छोटेखानी तारांगण उभे करुन विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल वाढविले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना सर्वस्तरातून पाठिंबाही मिळत आहे.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधनाबाबतची उत्सुकताही वाढू लागली आहे.
मुंबई येथील नेहरू तारांगण सर्वांच्याच परिचित आहे. परंतु त्याठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थी पोहोचू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन गावंड यांनी शाळेमध्येच तारांगण उभारण्याची संकल्पना मनात आणली. या संकल्पेनेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, शिक्षणाधिकारी पुनीता गुरव, गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांनी चालना दिली. तसेच तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वय संदीप वारगे यांच्या पुढाकाराने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरिण्यास सुरुवात केली. मिनी तारांगणासाठी लागणारे साहित्य, माहिती रात्रीचा दिवस करून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध केली. मिनी तारांगणासाठी लागणारे कापड व इतर साहित्य प्राप्त करून अनेक महिने यावर त्यांनी काम सुरू केले. अथक परिश्रमानंतर अखेर मिनी तारांगण तयार झाले आहे.
या तारांगणाचे तारांगणाचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे मोठा आकाराचा घुमट प्रोजेक्शन स्क्रीनवर तारे, ग्रह आणि इतर खगोलीय वस्तूंची दृष्ये दिसण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींचे अनुकरण करण्यासाठी वास्तववादीपणे हलविता येतात. स्टार बॉल्स, लाइड प्रोजेक्ट, व्हिडिओ. अशा विविध मार्गांनी प्रोजेक्शन तयार केले आहे. सुमारे 40 विद्यार्थी बसून या तारांगणातून ग्रह तारांचा आनंद प्रत्यक्षात घेतील अशी सुविधा उपलब्ध करून ठेवली आहे.
हे तारांगण पाहण्यासाठी अन्य शाळेतील विद्यार्थी देखील भेट देऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील शाळांसाठी आकर्षण ठरले आहे. या मिनी तारांगणातून पृथ्वी, गुरु, बुध, शुक्र, मंगळ, शनि, युरेनस, नेपच्यून, प्लुटो अशा वेगवेगळ्या ग्रहांची माहिती प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना अनुभवता येत आहे. अभ्यासाबरोबरच वैज्ञानिक आवड निर्माण करणे. खगोलशास्त्राचा अभ्यास करणे, अशा अनेक प्रकारचा फायदा मिनी तारांगणातून विद्यार्थ्यांना होत आहे.
खगोलशास्त्राच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी आणि विविध तारकीय आणि खगोलशास्त्रीय घटनांवर चर्चा करून विद्यार्थ्यांना खगोलीय अभ्यासासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी संधी आणि प्रेरणा या निमित्ताने मिळाली आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना प्रश्नमंजूषा स्पर्धा, चित्रकला, विज्ञान, वक्तृत्व, खगोल कविता यासाठी उपयोग होणार आहे.
संतोष गावंड, शिक्षक