एस.पी.जैन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा


| नागोठणे | वार्ताहर |

कोकण एज्यकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील सरेमल प्रतापमल जैन ज्युनिअर कॉलेजच्या सन 1992-93 च्या बारावीतील वाणिज्य शाखेच्या वर्गमित्रांचा स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शुक्रवारी (दि.26) आनंदी वातावरणात पार पडला. गेली वर्ष-दोन वर्षे सर्व वर्गमित्र एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील असतांनाच अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश आले आणि तो अविस्मरणीय क्षण अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी सर्वांनी अनुभवला. यावेळी फारच हृद्य असा कार्यक्रम झाला. आपल्या आठवणी सांगताना काहीजण भावुक झाले. काहींनी छानपैकी गाणी गाऊन व नृत्ये करून या स्नेहमेळाव्यात रंगत आणली. त्यानिमित्ताने सर्व मित्रांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कांचन ठाकूर, किशोर शिर्के, किशोर घासे, महेश पवार, संतोष लाड, निवृत्ती कुथे, चंद्रकांत कुथे, दत्ता गदमले, दगडू शिर्के, महेंद्र खांडेकर, स्मिता दळवी-ठाकूर, अश्‍विनी मोरे, सुनंदा नागोठकर, रंजना म्हात्रे, हेमलता लाड, मिनल कजबजे, भारती ठाकूर आदी उपस्थित होते. सर्पमित्र म्हणून नागोठणे विभागात प्रसिध्द असलेले किशोर शिर्के व अ‍ॅड. महेश पवार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

Exit mobile version