‘जीवनधारा’चे उन्हाळी शिबीर उत्साहात

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील जीवनधारा सामाजिक संस्था वरसगाव-कोलाड या संस्थेच्यावतीने दि.24 व 25 मे रोजी दोन दिवसीय उन्हाळी शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री वन्यजीवन रक्षणार्थ सामाजिक संस्था कोलाड या संस्थेचे संस्थापक सागर दहिंबेकर व टीम, ग्रेगोरियन पब्लिक स्कूलमधील शिक्षिका नीलम मॅडम व त्यांचा स्टाफ तसेच जीवनधारा संस्थेच्या संचालिका हिल्डा मॅडम, फादर फ्रान्सिसको, फादर रुडोल्फ, रोहामधील योगा क्लासेसच्या टीचर विभा चोरगे, मुंबईमधील योगा टीचर कांचन घावटे, कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन येथील प्रो. कल्याणी तलवेकर आणि राष्ट्रवादी महिला अध्यक्षा प्रीतम पाटील उपस्थित होत्या. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

या शिबिरात ग्रेगोरियन स्कूलमधील नीलम मॅडम यांनी मुलांसोबत अ‍ॅक्टिव्हिटी व डान्स घेतले. त्यानंतर सह्याद्री वन्यजीवन रक्षणार्थ सामाजिक संस्था कोलाड संचालक सागर दहिंबेकर व त्यांची टीम यांनी मुलांना पर्यावरणविषयी माहिती दिली. विभा चोरगे व कांचन घावटे यांनी मुलांना योग शिकवून योग आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचे आहेत हे मुलांना सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले. तसेच प्रीतम पाटील यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. या शिबिरात 36 आदिवासीवाड्यांमधून एकूण 150 मुले आणि मुलींनी सहभाग घेऊन विविध कार्यक्रमांचा आनंद लुटला. शिबिराचे यशस्वीतेसाठी जीवनधारा सामाजिक संस्थेचे सर्व संचालक व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version