निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेणार
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. निवडणूक आयोगाची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून त्यांच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती दिलेली नाही.
शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातंय. तर शिंदे गटाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.