शिंदे गटाची पुन्हा सरशी; ठाकरे टेन्शनमध्ये

। मुंबई । प्रतिनिधी ।
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्याने आता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन हे 2 आणि 3 जुलैला पार पडणार आहे. यामध्ये शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यापूर्वी राज्यपालांनी 30 जूनला विशेष अधिवेशन बोलवत ठाकरे सरकारला विधीमंडळात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यावेळीही शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत ही बहुमत चाचणी पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. शिंदे सरकारविरोधातील शिवसेनेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभूंनी ही याचिका दाखल केली होती. हा शपथविधी बेकायदेशीर आहे. कुठल्या नियमांखाली सत्तास्थापनेचे निमंत्रण देण्यात आले, असा सवालही या याचिकेत करण्यात आला होता. तसेच, या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच, शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या निलंबन प्रकरणात 11 जुलैला ठरल्याप्रमाणे सुनावणी होणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

Exit mobile version