तालिबानने मानले भारताचे आभार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

यंदाच्या आयसीसी टी-20 विश्‍वचषकात अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करुन उपांत्य फेरीत धडक मारली. त्यामुळे देशातील करोडो क्रिकेट चाहतेही याचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर जल्लोष करत आहेत. अफगाणिस्तानच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात सत्तेवर असलेल्या तालिबानने भारताला खास संदेश दिला आहे. आम्ही भारताचे आभारी आहोत की त्यांनी अफगाणिस्तान संघांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. त्यांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. भारताने गेल्या 10 वर्षांत अफगाणिस्तान क्रिकेटच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अफगाणिस्तान क्रिकेटच्या विकासासाठी भारताने फक्त आर्थिक आणि तांत्रिक मदत केली नाही, तर मैदानसुद्धा दिले आहेत. डेहराडून हे फार पूर्वीपासून अफगाणिस्तानचे घरचे मैदान आहे. अफगाणिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी परदेशी संघ डेहराडूनला येत होते. परंतू, आता आयपीएलमध्येही अफगाणिस्तानच्या खेळाडूंना मोठी मागणी आहे.

Exit mobile version