फार्महाऊसमधून ट्रान्सफॉर्मरची चोरी

। पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यात फार्म हाऊसमधील चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून चोरट्यांनी वीज ट्रान्सफॉर्मर लक्ष केले आहे. तालुक्यातील अमनोली गावाच्या हद्दीतील गणेश कानडे यांच्या मालकीच्या रिव्हर साईड फार्म हाऊसमधून विद्युत ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत खांबावरील वीज वाहिन्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

याबाबत मालक गणेश कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन ट्रान्सफॉर्मर आणि वीज वाहिन्याची जोडणी (दि.2) फेब्रुवारीला महावितरणाच्या अधिकृत परवानगीने करण्यात आली होती. मात्र, महिन्याभरातच चोरट्याने ते नवीन ट्रांसफार्मर आणि विद्युत वाहिन्या लंपास केल्या आहेत. चोरीला गेलेला ऐवज अंदाजे आठ लाख किमतीचा असल्याचे कानडे यांनी सांगितले. या चोरीच्या घटनेची तक्रार गणेश कानडे यांनी जांभूळपाडा पोलीस ठाण्यात केली असून पोलिसांना या चोरीचा तपास लावण्यात यश आलेला नाही. चोर सापडत नसल्याने तालुक्यातील फार्म हाऊस मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version