| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळमधील विद्युत चोरी संदर्भात चाळीमध्ये वीज चोरी होत होती. विद्युत चोरीला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ महावितरणकडून कारवाई करण्यात आली. दरम्यान, महावितरणाचे कर्मचाऱ्यांनी तत्काळ चोरीला जात असलेली विद्युत थांबवली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून विद्युत पोळ वरून चोरून घेण्यात आलेली लाईन काढून टाकण्यात आली आहे.
नेरळ परिसरामध्ये महावितरणाची कृपादृष्टी चाल धारकांवरती होताना दिसून येत होती. विद्युत मीटर नसताना देखील विद्युत पोळ वरून आलेल्या वायरला डायरेक्ट कनेक्शन करून वीज चोरी केली जात असताना महावितरणाचे दुर्लक्ष होत होते. नेरळमधील मोहाचीवाडी जवळ असलेली कोमलवाडी येथे श्री साई परफेक्ट होम इथे खूप मोठ्या प्रमाणात चाळी उभारण्यात आलेल्या आहेत. गेली सात-आठ वर्ष ही लोक चोरून विजेचा वापर करत होते. त्या ठिकाणी महावितरणाचे कर्मचारी अनेक वेळा जात होते. परंतु, त्यांच्याकडून त्या चाळधारकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते. या चाळी साठी लागणाऱ्या पाण्याची टाकी देखील विद्युत चोरून मोटर पंपाने भरली जात होती. हा सर्व महावितरणच्या नजरेखाली आणून देताच महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत केंद्रे यांनी संबंधितांवर कारवाई करून तत्काळ चोरीस जात असलेली विद्युत खंडित करण्याचे आदेश स्थानिक महावितरण कर्मचाऱ्यांना देण्यात आले.







