प्रवासादरम्यान महिलेच्या मंगळसूत्राची चोरी

| माणगाव । वार्ताहर ।

प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधील दिड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरले. सदरील घटना (दि.28) सकाळी 10:50 वाजण्याच्या दरम्यान एसटी स्टॅन्ड माणगाव येथे घडली. याची तक्रार माणगाव पोलीस ठाणे दि.31 ऑक्टोबर रोजी नीता नितीन खैरे (वय-45) रा. परेल पूर्व, मुंबई यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

फिर्यादी नीता या त्यांच्या धार्मिक कार्यक्रमाकरिता महादपोली ता.माणगाव येथे जाणेकरिता दादर ते माणगाव असा मांडवी एक्प्रेसने प्रवास करून उतरल्या. त्यानंतर माणगाव रेल्वे स्टेशन ते माणगाव एसटी स्टॅन्ड रिक्षाने प्रवास केल्यानंतर फिर्यादी या माणगाव एसटी स्टॅन्ड ते मोर्बा एसटी स्टॅन्ड असा रिक्षातून प्रवास करून भाड्याचे पैसे देण्याकरिता पर्सची चैन उघडली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या पर्समध्ये लहान कप्प्याची चैन उघडी दिसली. त्यावेळी फिर्यादीने आत ठेवलेले सोन्याची पट्टी डिझाईनचे काळे मणी असलेले पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र कोणातरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी.भोजकर हे करीत आहेत.

Exit mobile version