वृध्देच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास

| पोलादपूर | वृत्तसंस्था |

तालुक्यातील महालगूर येथील एका वृध्देच्या हातातील 2 सोन्याच्या बांगड्या अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना पोलादपूर एसटी स्थानकामध्ये घडली असून याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (दि.2) मे रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास सुलोचना सिताराम घाडगे यांच्या हातातील दोन वापरत्या तीन तोळ्याच्या बांगड्या त्या एसटीमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या वृध्दापकाळाचा गैरफायदा घेऊन हातातून ओढून लंपास केल्या. तीन तोळे वजनाच्या फुलांची डिझाईन असलेल्या या जुन्या वापरत्या बांगडयांची किंमत पोलीस तक्रारीत 45 हजार रूपये नोंद करण्यात आली असून सध्याच्या बाजारभावानुसार 2.75 लाख रूपये किंमत होत आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार बामणे हे पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version