चोरी करून पळून जाणार्‍या चोराला पकडले

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत शहरातील खाटीक आळी मध्ये राहणारे कांबळे दाम्पत्य यांच्या घरी मध्यरात्री दोन वाजता चोरी करून पळून जाणार्‍या चोराला कर्जत रेल्वे पोलिसांनी पकडले. कांबळे दाम्पत्य यांच्या सतर्कता आणि रेल्वे पोलीस तसेच ग्रामीण पोलीस यांच्या समयसूचकता यामुळे तो चोर काही मिनिटात पोलिसांच्या हाती लागला.

रेल्वे स्टेशन परिसरातील बाजारपेठ लगत असलेल्या खाटीक आळी येथील रहिवाशी संतोष कांबळे आणि शर्वरी संतोष कांबळे दाम्पत्य यांचे घर आहे. वरच्या मजल्यावर झोपलेल्या त्यांच्या मुलाने आपल्या आईला फोन करून कशासाठी माझ्या खोलीमध्ये आलेली असे विचारले, त्यामुळे कांबळे दाम्पत्य उठवून घराबाहेर बघण्याचा प्रयत्न केला असता इमारतीच्या पाईप वरून चोर उतरत असल्याचे दिसून आले. त्याला पाहून आरडाओरड केली मात्र अंधाराचा फायदा घेवून हा चोर पळून गेला, मात्र त्या धावपळीत त्या चोराची चप्पल येथे राहिली होती.

या घटनेबाबत त्यांनी तात्काळ कर्जत पोलीस स्टेशन आणि रेल्वे पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला आणि चोराची देहबोली बद्दल माहिती दिली. कर्जत पोलिसांनी रात्रपाळीवर असलेल्या पोलिसांना त्या चोराची माहिती दिली. कर्जत रेल्वे पोलीस वरिष्ठ निरीक्षक संभाजी यादव यांनी आपल्या स्टाफला कर्जत स्थानकात लक्ष ठेवण्यात सांगितले.

पोलिसांनी अनवाणी प्रवासी स्थानकातून मुंबईकडे जाणारी लोकल पडकून जातो का? याकडे लक्ष दिले. त्यावेळी अवघ्या काही मिनिटात सुटणारी मुंबई कडे जाणारी लोकल पकडून तो चोर पसार होण्यासाठी कर्जत स्थानकात पोहचला आणि पोलिसांच्या हाती लागला. त्या प्रवाशाची चौकशी आणि त्याच्या पिशवीची तपासणी केली असता पोलिसांना सोन्याचे झुमके, महागडे घड्याळ, रोख रक्कम असा ऐवज आढळून आला. पोलिसांचे दक्षतेमुळे आणि तत्परतेमुळे मध्यरात्रीच्या वेळी चोरास पकडून कर्जत पोलीसांकडे सोपविले.

Exit mobile version