रोहा-चणेरा मार्गावर बर्निंग कारचा थरार

प्रसंगावधानतेमुळे जीवितहानी टळली

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा-चणेरा मुख्य महामार्गावर स्विफ्ट कारने अचानक पेट घेतला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितनाही झाली नाही. परंतु, या आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे.

एमएच-04-डीआर-3882 या कारमधून एक परिवार पर्यटन करण्यास मुरुड काशीद बीचवर गेले होते. ते पुन्हा माघारी रोह्याकडे येत असताना गोफणनजीक हॉटेल योगिता हीराच्या समोर रात्री आठच्या सुमारास चालत्या कारने पेट घेतला आणि एकच खळबळ उडाली. मात्र, प्रसंगावधानामुळे गाडीतून प्रवास करणारे कुटुंब हे सुखरूप बाहेर आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. दरम्यान, हॉटेलात काम करणारे कर्मचारी तसेच नागरिकांनी पेट घेतलेली कार विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले व ती आग आटोक्यात आणली. कारचे या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version