भाकरवडमध्ये रंगणार कबड्डीचा थरार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील बि. के. एम. भाकरवड आयोजित शनिवार (दि.3) कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4 वाजल्यापासून हा थरार रंगणार आहे. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

यावेळी माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून कबड्डीचे सामने या परिसरात आयोजित केले जात आहेत. याही वर्षी हा पुरुष गटातील कबड्डीचा थरार पंचक्रोशीतील कबड्डीप्रेमींना पाहता येणार आहे. विद्यूत झोतामध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम ते तृतीय क्रमांकाला आकर्षक बक्षीसे वितरीत केली जाणार आहेत. उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई करणार्‍या खेळाडूंना देखील यावेळी सन्मानित केले जाणार आहे.

Exit mobile version