ठाण्यात रंगणार कबड्डीचा थरार

| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

ठाण्यातील सुधागड तालुका रहिवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे या संस्थेच्या विद्यमाने संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी सुधागड तालुकास्तरीय कबड्डी सामन्याचं आयोजन श्री मावळी मंडळ मैदान, चरई, ठाणे येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुधागड तालुक्यातील संघांनी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रवेश फॉर्म पूर्ण भरून संस्थेच्या कार्यालयात सायंकाळी 6:30 ते 9 या वेळेत जमा करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी केले आहे. दरम्यान, सोमवार 1 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता सहभागी संघाचे लॉट्स काढण्यात येतील लॉटस काढण्यासाठी प्रत्येक संघाचा प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघ प्रवेश फी-रूपये 500 आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संस्थेचे क्रीडा समितीप्रमुख राकेश थोरवे (9987002829)यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version