शालेय ‌‘ऑलिंपिक’ स्पर्धांचा थरार

श्री स्वामीनारायण गुरुकुलात स्पर्धेचे आयोजन

| रसायनी | वार्ताहर |

प्रत्येक शालेय खेळाडूला उच्चस्तरीय स्पर्धांद्वारे स्वतःला अजमावण्याची संधी मिळावी, यासाठी नवी मुंबई चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेत ऑलिंपिक 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा धमाका…

या स्पर्धेत क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल, डॉजबॉल, हॉलिबॉल, कॅरम, रस्सीखेच, बुद्धिबळ, बॅडमिंटन, 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे, टेबल टेनिस अशा विविध स्पर्धांचे आयोजन गुरुवार, दि.7, 8 व 9 डिसेंबर रोजी गुरुकुलच्या भव्य अशा मैदानात करण्यात आले आहे. विविध वयोगटात रंगणाऱ्या या स्पर्धेत कोणत्याही शाळेचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे ही स्पर्धा प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्णसंधी असेल. विशेष म्हणजे, ही स्पर्धा निःशुल्क आहे.

या स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल न्यू पनवेल, रिलायन्स फाऊंडेशन स्कूल लोधिवली, जी.जे. एम इंग्लिश मीडियम खालापूर, रिलायन्स फाऊंडेशन इंग्लिश माध्यम स्कूल लोधिवली, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल लोधिवली, हिमांशू दिलीप पाटील स्कूल नढाळ, नॅशनल पब्लिक स्कूल खोपोली, श्री स्वामीनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय नवी मुंबई स्कूल आणि सेंट विन्सेंट पीलोटी स्कूल रिसवाडी या शाळांनी सहभाग निश्चित केला आहे.

Exit mobile version