। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नवगावमधील न्यु जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने दोन दिवस टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. शनिवारी(दि. 20) सकाळी क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा डॉ. उल्हास वाटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी रविवारी अंतिम सामन्यांपर्यंत टेनिस क्रिकेटचा थरार क्रिडा प्रेमींना पहावयास मिळणार आहे.
यावेळी उपसरपंच निखील कवळे, राजेंद्र ठाकूर, न्यु जय हनुमान मित्र मंडळाचे पदाधिकारी, सभासद, खेळाडू, क्रिडा प्रेमी उपस्थित होते. नवगावमधील ग्रीन पार्क स्टेडिअममध्ये होणार्या या स्पर्धेत एकूण 24 संघाने सहभाग घेतला आहे. उद्घाटनीय सामना माधुरी ताई स्मरणार्थ नवगाव संघ व धोकवडेमधील न्यु जय हनुमान संघ या दोन संघात झाला. यामध्ये नवगाव संघाने उत्कृष्ट कामगिरी बजावत उद्घाटनीय सामना जिंकला. रविवारी(दि.21) सायंकाळपर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत. अंतिम सामन्यानंतर प्रथम क्रमांकाला रोख वीस हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला दहा हजार रुपये व तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविले जाणार असल्याची माहिती ओमकार घरत यांनी दिली.
नवगावमध्ये टेनिस क्रिकेटचा थरार
