| सुकेळी । वार्ताहर ।
नागोठणे जवळच असलेल्या सुकेळी-वेताळवाडी येथे जय हनुमान क्रिडा मंडळ यांच्या विद्यमाने कबड्डी सामन्यांचे आयोजन शनिवार दि.26 ते दि.27 रोजी करण्यात आले आहे. या सामन्यांचे उद्घाटन विधानपरिषदेचे आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. या सामन्यांत फक्तठाकुर, कातकरी समाजातील संघ सहभागी होणार आहेत.
या दोन दिवस होणार्या सामन्यांमध्ये प्रथम क्रमांकास 10,000 रु व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास 7,000 रु व चषक, तसेच तृतिय व चतुर्थ क्रंमाकास अनुक्रमे 4,000 व 3,000 तसेच आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. तर उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पक्कड, मॅन ऑफ दी सिरीज मिळवणार्यास आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी मात्र 700 रु.प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभागी होऊन सहकार्य करावे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी महेश निरगुडे (7498000065), रमेश हंबीर (7875708422), मंगेश हंबीर (9168920179) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.