महिला कबड्डी संघांचा थरार

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी

| पुणे | प्रतिनिधी |

महिलांच्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने औरंगाबाद संघावर 56-6 अशी दणदणीत मात करीत विजय साकारला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे 34-2 अशी निर्णायक आघाडी होती. सातारा संघाने ठाणे ग्रामीण संघावर 40-35 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला सातारा संघाकडे 22-12 अशी आघाडी होती. सातारच्या श्रुती बेंद्रे व सायमा पठाण यांनी आक्रमक खेळ केला.

मुंबई उपनगर पश्‍चिम संघाने अहमदनगर संघावर 29-17 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला उपनगर पश्‍चिम संघाकडे 14-7 अशी आघाडी होती. उपनगर पश्‍चिमच्या कोमल देवकर, करिना कामतेकर यांनी चौफेर खेळ केला. मुंबई शहर पश्‍चिम संघाने बीड संघावर 70-4 असा एकतर्फी विजय मिळविला. मध्ंयतराला मुंबई शहर पश्‍चिम संघाकडे 36-2 अशी भक्कम आघाडी होती.

नंदुरबार संघाने सोलापूर संघावर 63-34 असा विजय मिळविला. मध्यंतराला नंदुरबार संघाकडे 28-23 अशी आघाडी होती. पालघर संघाने परभणी संघावर 42-25 अशी दणदणीत मात करीत विजय साकारला. मध्यंतराला पालघर संघाकडे 25-13 अशी आघाडी होती. पालघरच्या पूजा पाटील व ज्यूली मिस्कीता यांनी चौफेर चढाया करीत सहज विजय मिळविला.

सांगली संघाने नाशिक ग्रामीण संघावर 47-19 असा विजय मिळविला. मध्यंतराला सांगली संघाकडे 25-9 अशी आघाडी होती. सांगलीच्या श्रध्दा माळी व समृध्दी देशमुख यांनी चांगल्या चढाया केल्या. नाशिक शहर संघाने जळगाव संघाचा 69-14 असा दारूण पराभव केला. मद्यंतराला नाशिक शहर संघाकडे 33-10 अशी आघाडी होती. पिंपरी चिंचवड संघाने धुळे संघावर 44-18 अशी दणदणीत मात करीत विजय मिळविला. पुणे शहर संघाने रायगड संघावर 32-27 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला पुणे शहर संघ 17-20 असा पिछाडीवर होता. पुणे शहर संघाच्या आम्रपाली गलांडे हिने मध्यंतरानंतर जोरदार आक्रमण करीत विजय खेचून आणला.

Exit mobile version