| सुकेळी | वार्ताहर |
वाकणनजीक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
वडखळ ते सुकेळीकडे जाणारा ट्रेलर वाकण पुलाच्या पुढे आल्यानंतर महामार्गावर पडलेल्या महाभयंकर खड्ड्यांमुळे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. सुदैवाने बाजूला दुसरा कोणताही वाहनचालक नसल्यामुळे यामध्ये मोठी दुर्घटना टळली. या अपघातामुळे काही वेळ वाहतुक कोंडी झाली होती. तात्काळ वाकण टॅबचे पोलिस निरीक्षक संदीप सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपूर्ण टीमने तातडीने क्रेनच्या सहाय्याने महामार्गावरील पलटी झालेला ट्रेलर व कॉईल बाजुला करुन वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला.
महामार्गावरील खड्ड्यांमुळे ट्रेलर पलटी
