। दापोली । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात लाडघर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. औदुंबरवाडी येथे राहणारे ग्रामस्थ सुनील होलम (62) यांचा गेली अनेक वर्ष पर्यटनाचा व्यवसाय असून ते हॉटेल सुखसागरचे मालक आहेत. मंगळवारी (दि. 03) दुपारनंतर घरातच काही काम करत असताना त्यांना अचानक इन्व्हर्टरच्या विजेचा शॉक लागला. यानंतर ते अस्वस्थ झाले. त्यांना तात्काळ रिक्षातून दापोली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.