ट्रेलर झाला पलटी; चालकविरोधात गुन्हा दाखल

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
नारपोली बस स्टॉपच्या पुढे पातळगंगाकडे जाणाऱ्या रोडच्या उजव्या बाजूस भरधाव वेगाने आलेला ट्रेलर पलटी झाला. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ट्रेलर चालक तुफे अहमद इस्तेखार सिद्धीकी (वय 33) राहणार जासई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रेलर क्रमांक एम एच ०८ डब्ल्यू ४३५३ वरील चालक तुफे अहमद याने भरधाव वेगाने ट्रेलर चालवला व त्याचे ट्रेलर वरील नियंत्रण सुटले तरी वर येऊन नारपोली बस स्टॉप जवळील इलेक्ट्रिक पोल जवळ पलटी झाला या ट्रेलर व कंटेनर चेपला तसेच इलेक्ट्रिक पोलला धडक देऊन त्याचे मोठे नुकसान झाले.

Exit mobile version