शासनाचे करोडो रुपये वाया
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील रस्त्याच्या दुतर्फाच्या मधोमध मुसळधार पाऊस पडूनही फुलझाडे लावण्यासाठी सुरुवात केली नाही. परंतु, भरउन्हाळ्यात रस्त्याच्या मधोमध वृक्षलागवड करून त्यांना लाखो लीटर पाणी घालून ती झाडे सुकून गेली. यामुळे सरकारी तिजोरीतील करोडो रुपये वाया गेले. यावरुन शासनाचे काम म्हणजे वरातीमागून घोडे असेच असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यासाठी वनविभागाला 17 कोटी रुपये निधी वर्ग केला होता. परंतु, तेव्हा वृक्षलागवड करण्यात आली. याला कारण महामार्गाचे काम पूर्ण झाला नसल्याने हा निधी टॅप करण्यात आला. तरीही भरउन्हाळ्यात रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात खड्डे खोदून वृक्षलागवड करण्यात आली. त्या फुल झाडे व वृक्षाना भरउन्हात टँकरने पाणी घालण्यात आले. तरीही ही झाडे सुकून गेली असून, शासनाचे करोडो रुपये वाया गेले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाला 18 वर्षे पूर्ण झाली तरी या महामार्गाचे काम पूर्ण होईना? या कामासाठी तोडण्यात आलेल्या झाडांच्या जागी नवीन झाडे लावली असती तर ती अद्याप मोठी झाली असती. या महामार्गावर नवीन झाडे लावली गेली नसल्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसत आहे. उन्हाळ्यात प्रवाशांना उन्हाचा त्रास प्रवाशांना भोगावा लागत आहे.
मुंबई-गोवा हायवेवरील दुतर्फा नंदवन फुलावा या उद्देशाने फुलझाडे लावण्यात आली. परंतु, लावलेल्या फुलझाडे जगविण्यात संबंधित ठेकेदार अपयशी ठरले. याला कारण नियोजनशून्य असल्यामुळे कोणतेही काम करण्यासाठी अपयश येत आहे. आता गेल्या मे महिन्यापासून अवकाळी पाऊस बरसला तर 10 जूननंतर मुसळधार पाऊस झाला. परंतु, या कालावधीत वृक्षलागवड करणे सोयीचे असून, या कालावधीत लागवड केली तर पाणी घालण्याचा प्रश्न मिटेल. यामुळे आता तरी वृक्षलागवड केली जावी, असे प्रवासीवर्गातून बोलले जात आहे.
