झाडांची छाटणी केली मात्र फांद्या तेथेच

भिसेगाव जिल्हा परिषद शाळेची व्यथा

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरात भिसेगाव येथे रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या शाळेच्या दोन इमारती अजून त्या इमारतींच्या बाजूला वाहणार्‍या वीज वाहिन्या यांच्या आबाजुबाजुची झाडे महावितरण कडून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तोडण्यात आली आहेत. 15 दिवसांचा कालावधी लोटला तरी तोडण्यात आलेली झाडे महावितरणकडून बाजूला काढण्यात आलेली नाहीत. त्याचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांना आवरत तसेच मैदानात खेळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

भिसेगाव येथे रायगड जिल्हा परिषदेची शाळा असून त्या ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंतची विद्यार्थी शिक्षण घेतात. हि शाळा रस्त्याच्या अगदी लागून असल्याने शालेच्या आवाराच्या बाजूने शालेच्या कुंपणाच्या वरच्या भागातून वीज वाहिन्या गेल्या आहेत. शाळेच्या आवारात गेली काही वर्षात सातत्याने वृक्षारोपण केले जात असल्याने शाळेच्या आवारात मोठया प्रमाणात झाडे झाली आहेत. दरवर्षी महावितरणकडून वीज वाहिन्यांना लागणार्‍या झाडाच्या फांद्या तोडण्यात येत असतात. तशाच प्रकारे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महावितरणकडून झाडाच्या फांद्या भिसेगाव जिल्हा परिषद शाळा परिसरात तोडण्यात आल्या. त्यावेळी झाडणाच्या फांद्या आणि पालापाचोळा हा तेथेच टाकून ठेवण्यात आला. उद्या येऊन छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या जातील असे सांगण्यात आले. त्यात त्यावेळी जिल्हा परिषद शाळा सुरु देखील झाल्या नव्हत्या.

ज्या दिवशी शाळा सुरु झाली त्यादिवशी शालेच्या आवारात असलेल्या झाडाच्या फांद्या यामुळे विद्यार्थ्यांना चालणे देखील कठीण होऊन बसले होते. शाळचा प्रवेशोत्सव असल्याने शालेच्या वरच्या वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी छाटलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला करून घेतल्या.त्यानंतर त्याबाबत महावितरण कार्यालयात जाऊन झाडाच्या फांद्या काढण्याची सूचना पालकांनी केली.

Exit mobile version