आदिवासींची पाणीसमस्या मिटणार

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे महिला त्रस्त

| आपटा | वार्ताहर |

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायती हद्दीतील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची समस्या असून, याठिकाणी कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील महिला त्रस्त झाल्या होत्या. दरम्यान, जि.प. माजी सभापती उमा मुंडे यांच्या पुढाकारातून जलजीवन मिशन अंतर्गत याठिकाणी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, येथील पाणीसमस्या कायमची मिटणार आहे.

महाराष्ट्र जल प्राधिकरण जलजीवन मिशन अंर्तगत तळेगाव, पानशील, मोहोपाडा आळी, आंबीवली, नवीन पैसरी, रिस, शिवनगर, नवीन वसाहत रिस खाने, आंबीवली या सर्व आदिवासी वाड्यांसाठी पाणीपुरवठा योजना मंजुरी करण्यात आली आहे. यासाठी मोहोपाडा येथे 10 लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधणयात येणार आहे. नवीन वसाहत रिस व रिस येथे 16 लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. तर, तळेगाव येथे एक लाख लीटर क्षमतेची टाकी बांधणयात येणार आहे. सदर योजना राबविण्यात व मंजुरीसाठी उमा मुंढे व मोहोपाडा माजी सरपंच संदीप मुंढे यांनी प्रयत्न केले आहेत.

या जलजीवन मिशन योजनेसाठी पन्नास टक्के निधी केंद्र सरकार व पन्नास टक्के निधी महाराष्ट्र शासनाचा आहे. यामुळे या भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या उरणार नाही, असे उमा मुंढे यांनी सांगितले.

Exit mobile version