रास्त भाव धान्य वितरणाचा ट्रक पलटी

| मुरूड । वार्ताहर ।
मुरुड शासकीय धान्य गोडावूनमधून रास्त भाव धान्य दुकानदारांना धान्य वितरित करुन परतत असताना या रिकाम्या टेंपो ट्रकला मुरूड ताराबंदर गावानजीक अचानकमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला पाहून चालकाने ब्रेक मारला. पाऊस पडत असल्याने रस्ता ओला झाला होता त्यामुळे हा टेंपो घसरुन रस्त्याच्याकडेला जाऊन पलटी झाला. या टेंपोमध्ये चालक व दोन मजूर होते सुदैवाने कोणालाही मार लागला नाही व सर्वजण सुखरूप असल्याचे समजते.

Exit mobile version