ब्रेक फेल झाल्याने ट्रक कलंडला

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

कर्नाटकवरून निघालेला ट्रक हा मुंबई-पुणे या मार्गावरील 43.800 या लेनवर येताच ट्रकच्या एअर पाईपमध्ये बिघाड झाल्यामुळे ब्रेक फेल झाला. यामुळे हे वाहन रिव्हर्स येऊन सिमेंट डिव्हायडरला ठोकर लागून पहिल्या व दुसर्‍या लेनवर पलटी झाला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून वाहनांचे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे या मार्गावरील वाहनचालक नयास पशा वय 26 वर्षे रा.कर्नाटक हा आपल्याजवळ असलेल्या ट्रक घेऊन मुंबईच्या दिशने जात असताना 43.800 या ठिकाणी येताच एअर पाईपमध्ये बिघाड झाल्यामुळे ब्रेक फेल झाला. यामुळे ट्रक रिव्हर्समध्ये सिमेंटच्या डिव्हायडरला ठोकल्यामुळे ट्रक कलंडला. त्यामध्ये 35 टन माल असल्यामुळे तो खाली केल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे त्यास हायड्राच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल महामार्गावरील वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनच्या यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.

Exit mobile version