एक वॉर्ड,एक नगरसेवक प्रभाग रचना; आराखड्याचे आदेश
मुरुड | सुधीर नाझरे |
मुरूड नगरपरिषदेसह राज्यातील सर्व 227 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कालावधी डिसेंबर 2021 या महिन्यात संपत असल्याने निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे.राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदेला प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे दिले आदेश देण्यात आले आहे.त्यानुसार निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे, प्रारूप वॉर्ड रचनेची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
नगरपरिषद, नगरपंचायतीची मुदत डिसेंबर- फेब्रुवारी मध्ये संपत आहेत. अशा नगरपरिषद, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून वार्ड रचनेचा प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्यात यावा,प्रभाग रचना पद्धतीत बदल करण्यात आला असून एक वॉर्ड हा प्रभाग समजला जाईल. हा आराखडा तयार करीत असताना भौगोलिक बदल, नद्या, नाले नवीन रस्ते, पूल, इमारती इत्यादी विचारात घ्यावे नगरपरिषद, नगरपंचायत अधिसुचनेद्वारे त्याचे क्षेत्र निश्चित करून नकाशे तयार करावेत.आराखडा तयार करण्याची कार्यवाही तात्काळ म्हणजे 23 ऑगस्ट रोजी सुरू करावी. कच्चा आराखडा तयार केल्यानंतर तात्काळ तो आराखडा निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे कळविण्यात यावा. तयार केलेला कच्चा आराखड्याबाबतची गोपनीयता पाळण्यात यावी. सदरचा कच्चा आराखडा तयार करीत असताना वरील बाबी लक्षात घ्याव्यात. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटीशन दाखल आहे. न्यायालयाने 4 मार्च 21 रोजी दिलेल्या निकालानुसार करावयाची कार्यवाही ही आरक्षणाबाबत असल्याने प्रारूप वार्ड प्रसिद्धी व आरक्षण सोडत कार्यक्रमा बाबत सूचना अलाहिदा आपणास देण्यात येतील असेही निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
प्रभाग पद्धत बंद
यापूर्वीच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने झाल्या होत्या म्हणजेच चार वार्ड मिळून एक प्रभाग तयार करण्यात येत होता.परंतु आता ही पद्धत बंद करण्यात येऊन एक वॉर्डात एकच उमेदवार असणार आहे. वॉर्डामधील उभा राहणार्या एकाच उमेदवाराला एकच मत मतदारांना टाकता येणार आहे. एक पेक्षा जास्त मते टाकण्याची पद्धत आता बंद करण्यात आली आहे.डिसेंबर 2021 मध्ये कालावधी संपूष्ठत येणार्या नगरपरिषदेच्या निवडणुका या प्रथेप्रमाणे ऑक्टोम्बर अथवा नोव्हेम्बर मध्ये आचारसंहिता लावून घेण्यात येतात.त्याप्रमाणेच यंदाच्या निवडणुका सुद्धा विहित वेळेतच संपन्न होणार आहेत.त्यामुळे गणपती उत्सव संपताच सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे.
प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असणार आहे..तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच सन 2011 ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे.त्यानुसार 6 फेब्रुवारी 2020च्या आदेशातील परिच्छेद क्र.4नुसार सदस्यसंख्या निश्चित करून तितक्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे सांगण्यात आले.., सदर कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही दिनांक 23ऑगस्ट2021 पासुन सुरू करण्यात यावा आसा आदेश राज्य निवडणूक आयोगानी दिले आहेत. त्यामुळे थोडेच दिवसात नगरपरिषद निवडणुकांचे वारे वाहणार असून सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी माजणार आहे.