। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारमण यांनी देश गेल्या 12 वर्षापासून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. देशात गुंतवणूक देखील वाढत असून, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यावर आमचा भर आहे, असे त्यांनी नमूद केले. अर्थसंकल्पातून काय स्वस्त आणि काय महाग झाले याची यादी आता समोर आली आहे.
काय स्वस्त?
निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्करोग आणि मधुमेहावरील औषध स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन आणि ईव्ही बॅटरीही स्वस्त होणार आहेत.
-वैद्यकीय उपकरणे
-भारतात तयार होणारी कपडे
-कर्करोग, मधुमेहावरील औषधं
-क्रीडा साहित्य
-मोबाईल फोन
-अपघात विमा
-लिथियम आयन बॅटरी
-दुचाकी
-एलसीडी, एलईडी
-सौर पॅनेल
-ईव्ही वाहने, ईव्ही बॅटरी
-फ्रोझन फूड
-सीएनजी
-बायोगॅस
-परदेशी प्रवास
-परदेशातील शिक्षण
-चामड्याच निर्यात
-बीडी
काय महाग?
दारु, खनिज, शूज, पीव्हीसी फ्लेक्स शीट, सिगारेट,भंगार
अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा
*अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे आता आयकरात कुठलाच बदल करण्यात आला नसून, टॅक्स स्लॅब जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
*पायाभूत सुविधा, एमएसएमई उद्याोगांना चालना दिली जाणार, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स सेमी कंडक्टरसाठी ४० हजार कोटींची तरतूद
*प्रत्येक जिल्ह्यात उच्चशिक्षणासाठी मुलींसाठी वसतिगृह उभारले जाणार
*पशुपालन दुग्धव्यवसायासाठीचे अनुदान वाढवले जाणार, ५०० एकात्मिक मत्स्य केंद्र उभारली जाणार
*पुणे -मुंबईसह सात हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरचे सात मार्ग प्रस्तावित






