| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत दुखू लागल्यानं त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर क्रिटिकल केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. कार्डियॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजीव नारंग हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. याबाबत अद्याप रुग्णालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.