| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंडीत लघुशंकेसाठी थांबलेल्या एका दुचाकीस्वाराचा कठड्यावरून तोल जाऊन तो दरीत कोसळल्याची घटना रविवारी (दि. 9) सायंकाळी घडली. दरीत कोसळलेल्या त्या दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांनी अथक प्रयत्न करून बाहेर काढले. दुचाकीस्वार दरीत कोसळल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी उपचारासाठी कार्लेखिंड परिसरातील प्रयास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरीत कोसळलेला हा दुचाकी चालक मद्यसेवन केल्याने त्याचा लघुशंका करताना तोल गेल्याची चर्चा घटनास्थळी ऐकावयास मिळाली.