सामाजिक एकोपा अबाधित राखणारे विठ्ठल मंदिर भावी पिढीसाठी प्रेरणादायी

खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपदान
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुडसारख्या पर्यटन ठिकाणी विठ्ठल मंदिराची उभारणी करून मुरुडच्या नावलौकिकात भर पडली आहे. नऊ समाजाचे लोक एकत्रित येऊन देवळाची उभारणी नव्याने करून एक नवा आदर्श भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.आपला एकोपा भावी पिढीसाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपदान खासदार सुनील तटकरे यांनी मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी केले. मुरुड जुनी पेठ येथे असणारे दोनशे वर्षांपूर्वीचे भैरव विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा उद्घाटन समारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी तटकरे आपल्या मार्गदर्शनाखाली भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्ष अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, मंदिर कमिटीचे अध्यक्ष प्रा. विश्‍वास चव्हाण, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, महिला संघटिका शुभांगी करडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना विठ्ठल मंदिर कमिटीचे अध्यक्ष प्रा. विश्‍वास चव्हाण यांनी सांगितले की, मंदिर उभारणीसाठी नऊ समाजातील समाज बांधव व देणगीदार यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. मुरुड तालुकामधील एकमेव पुरातन मंदिर असल्याचे सांगितले. यावेळी मंदिर कमिटीमार्फत मंदिर उभारणीसाठी आर्थिक सहकार्य करणार्‍या व्यक्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला.

Exit mobile version