खंडाळेत इंडिया आघाडीचाच आवाज

| संतोष राऊळ | अलिबाग |

खंडाळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी कामगार पक्षासह ‌‘इंडिया आघाडी’ने कंबर कसली आहे. ‌‘इंडिया आघाडी’ने जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना संधी दिल्याने युवा मतदारांनी विकासासाठी एकत्रित येण्याचा निश्चय केला आहे. थेट सरपंचपदासाठी शेकापक्षाचे नासिकेत कावजी यांना आघाडीने उमेदवारी दिली आहे. नासिकेत कावजी यांना ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत शेकापक्षाच्या माध्यमातून गावात अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. यापुढेही अनेक विकासकामे आणि समाजोपयोगी कामे करण्याचा निर्धार ‌‘इंडिया आघाडी’ने केला आहे.

1 / 7


एकूण पाच प्रभाग असलेल्या खंडाळे ग्रामपंचायती हद्दीत जवळपास 4300 मतदार असून, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून उमेदवार निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 14 सदस्य आणि थेट सरपंचपदाचे उमेदवार नासिकेत मधुकर कावजी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायत हद्दीत शेकापच्या माध्यमातून अनेक विकासकामांची पूर्तता झाली आहेत. तसेच, विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. विकासकामांच्या जोरावर येथील मतदार त्यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे. आजपर्यंत शेकापने नागरी सुविधांवर भर दिला आहे. तसेच शिक्षणासाठी देखील वेळोवेळी सहकार्य केले आहे. शेकाप हा सर्वसामान्यांचा पक्ष असून, या ग्रामपंचायत क्षेत्रात जवळ-जवळ सर्वच विकासाची कामे ही शेकापच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. त्यामुळे सरपंचासह सर्वच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

2 / 7

खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील आगर आळी, पाचकळशी आळी, चौकळशी माळी आळीतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, आगरी समाज मंदिर निवारा शेड, बापदेव मंदिर नूतनीकरण, मारूती मंदिर, समाज मंदिर, महावीर देवस्थान मंदिर बांधणी, घरोघरी नळ योजना, श्रमदानातून सार्वजनिक विहीरींची साफसफाई, नवीन अंगणवाडी, अंगणवाडी व मराठी शाळेवर सौरउर्जा पॅनल बसविणे, मराठी शाळेसाठी शौचालय, चौकळशी-पाचकळशी आळीतील उघडी आणि संरक्षण भिंती बांधणे, 40 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे, शोषखड्डे, अंतर्गत गटारे, कचराकुंडी बांधणे, स्मशानभूमी सुशोभीकरण व निवाराशेड बांधणे, बौधवाडी अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, गणपती विसर्जन घाट बांधणे, सागांव गावातील अंगणवाडीचे नूतनीकरण, स्मशानभूमी शेड, घरोघरी नळ योजना, नवीन विहीर व केबीन बांधणे, मराठी शाळेची दुरूस्ती, तळवली गावातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण, नवीन विहीर बांधणे, अंगणवाडी व पाण्याची टाकी बांधणे, भुमीगत गटारे, सागांव मारूती मंदिर सुशोभीकरण, जरूमस देवी निवारा शेड, गणपती विसर्जन घाट बांधणे आदी अनेक कामे खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत शेकापच्या वतीने करण्यात आली आहेत. त्यामुळे मतदार या उमेदवारांना पसंती देत आहेत.

3 / 7



या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी नासिकेत मधुकर कावजी हे रिंगणात उतरले असून प्रभाग क्र.1 मध्ये निवास कृष्णा घरत, वंदना विलास नाईक, प्रभाग क्र.2 मध्ये रंजना रविंद्र नाईक,रजिता रविंद्र पाटील, प्रभाग क्र.3 मध्ये संकेत काशिनाथ वेळे, रूचिता प्रणय भगत, वैदेही विलास थळे, प्रभाग क्र.4 मध्ये संदेश बंडू पाटील, राखी संतोष गुरव, सुमन नरेश मेंगाळ, प्रभाग क्र.5 मध्ये संकेत शंकर पाटील, गणेश गोविंद नाईक, निलिमा संतोष कावजी, सिध्दार्थ अनिल गोंधळी हे निवडणूक लढविणार आहेत.

नियोजित कामे
प्रभाग क्र. 1 (नेहुली)
1.नेहुली स्मशानभुमी सुशोभीकरण करणे.
2. गावातील उर्वरीत अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे.
3. पाण्याचे योग्य नियोजन करणे.
4. गावदेवी मंदिर ते स्मशानभुमी रस्ता करणे.
5. संगम स्मशानभुमी सुशोभीकरण करणे.
प्रभाग क्र. 2 (खंडाळे गाव)
1. खंडाळे गावातील उर्वरीत अंतर्गत
2. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे.
3. होळीचा पार आणि निवारा शेड बांधणे.
4. संतोष पाटील ते शिवराम घरत संरक्षण भिंत बांधणे.
प्रभाग क्र. 3 (सागांव)
1. गावातील बोअरवेल दुरूस्ती करणे.
2. स्मशानभुमी सुशोभीकरण करणे.
3. भूमीगत गटारे बांधणे.
4. आदिवासी वाडीवर जाण्यासाठी पायऱ्या तसेच देवीसाठी शेड बांधणे.
5. बौधवाडीसाठी साकव व बौधविहार बांधणे.
6. सागांव बस थांबा बांधणे.
7. सार्वजनिक पाण्याची टाकी बांधणे.
8. अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिट व डांबरीकरण करणे.
9. गावदेवी शेड करणे.
10. धोलपाडा गणपती विसर्जन तलाव सुशोभीकरण करणे.
11. तलाव ते विकास माळी व सुरेखा थळेअंतर्गत रस्ता करणे.
12. नवीन स्मशानभुमी बांधणे.
प्रभाग क्रं.4 (तळवली)
1. नवीन समाज मंदिर, पिंपळ पार बांधणे.
2. गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करणे.
3. स्मशानभुमी शेड आणि नवीन लाईट जोडणी करणे.
4. अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे.
प्रभाग क्रं. 5 (पवेळे)
1. तलाव सुशोभीकरण करणे.
2. गणपती विसर्जन घाट बांधणे.
3. व्यायामशाळा बांधणे.
4. स्मशानभुमी सुशोभीकरण करणे.
5. खंडाळे नाका ते पवेळे मुख्य रस्ता करणे.
6. समाज मंदिर, पाण्याची नवीन टाकी बांधणे
7. सोलर रोड लाईट बसवणे.
8. काळ भैरेश्वर मंदिर व प्राथमिक शाळा सुशोभीकरण करणे.
9. नवीन अंगणवाडी बांधणे.
10. गावात सार्वजनिक शौचालय बांधणे.
11. कचराकुंडी बांधणे.
12. आदिवासी वाडीसाठी स्मशानभुमी, अंतर्गत रस्ते, रोड लाईट, समाज मंदिर, सार्वजनिक शौचालय बांधणे.
13. सागरगड येथे व्यायाम शाळा, अंतर्गत रस्ते, समाज मंदिर बांधणे व नियमित पाण्याची सोय करणे, आदी कामे भविष्यात करण्यात येणार आहेत.
Exit mobile version