दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; उद्या जाहीर होणार निकाल

। मुंबई । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (8) मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in.
Exit mobile version