| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाल्यानंतर आता इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्या निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहता येणार आहे. यंदा राज्यातून 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यातील 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकडून यासाठी नोंदणी करण्यात आली होती. उद्या 13 मे रोजी निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून आपले गुण ऑनलाईन पद्धतीने जाणून घेता येणार आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.
या लिंकवर पाहता येणार निकाल
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://mahresult.nic.in