प्रतीक्षा संपली! आमदारांच्या अपात्रतेवर उद्या होणार सुनावणी

| मुंबई | प्रतिनिधी |
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलची सुनावणी गुरुवारी दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे. दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे जमा करण्याची मुदत बुधवारी सायंकाळी 4 वाजता संपली आहे.

त्यानंतर यासंबधित 34 याचिकांचे सहा गट तयार करून त्यावर सुनावणी होणार आहे. त्याआधी राज्यात एक महत्त्वाची घडामोड घडली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीला गेले आहेत.

ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देत आहे. त्यामुळे ही सुनावणी लांबत आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या सुनावणीवेळी म्हटले होते. अर्जावर अर्ज येत आहेत, जर अजून अर्ज येत राहिले तर सुनावणी लांब जाईल. सर्वाच्च न्यायालयातील याचिका वेगळी आहे. इथली याचिका वेगळी आहे. असे राहुल नार्वेकर म्हणाले होते.

Exit mobile version