शेकापचे महादेव वाघमारे यांचे आंदोलन
। पनवेल । वार्ताहार ।
पुरे झाला भूमिपूजनाचा गाजावाजा इथे पनवेलच्या रस्त्याचा वाजलाय बँडबाजा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या विरोधात शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी खराब रस्त्याबाबत आंदोलन केले. येथील रस्ते लवकर खड्डे मुक्त करा, अशी मागणी करत खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन केले.
निवडणुकीचे वेध लागताच पनवेल महानगर पालिका करोडो रुपयाच्या कामाचा शुभारंभ करण्याचा तगदा सुरु केला मात्र, अनेक वर्ष रस्त्याची डागजुजी न केल्याने रस्त्याची भयानक अवस्था झाली आहे. याच रस्त्यावर पडलेल्या खड्डयातून श्री गणरायाचे आगमन आणि विसर्जन करावे लागले. या खड्ड्यात अनेक अपघात झाले आहेत. काहीना मनके दुःखीचा त्रास सुरु झाला आहे. चाकरमानी याच खड्डयातून रिक्षा मधून जातं होते. त्याच खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीता त्रास मागरिकांना सोसावा लागत आहे. खड्डे मुक्त करण्या करिता कोट्यवधींचा खर्च पालिकेकडून करण्यात आला. शेकापच्यावतीने खांदा वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावण्यात आली. दरम्यान, याप्रसंगी शेकाप माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, महिला कार्यकते उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी प्रत्येक खड्ड्यांची पूजा करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.
