| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील चिपळे येथील धोकादायक बनलेल्या इमारतीचा स्लॅब आणि भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या इमारतीत कोणीही राहत नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
चिपळे येथील माऊंट व्ह्यू इमारतीतील आठ इमारती धोकादायक बनलेल्या आहेत. ग्रामपंचायतीने त्यांना नोटीस देखील बजावल्या आहेत. सध्याच्या मुसळधार पावसामुळे धोकादायक बनलेल्या या माऊंट व्ह्यू बिल्डिंग नंबर तीन मधील स्लॅब आणि भिंत कोसळली आहे. या इमारतीत कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली आहे. या इमारतीच्या आजूबाजूला काही कुटुंब वास्तव्यास आहेत. या प्रकाराची माहिती शासकीय यंत्रणेला देण्यात आली आहे. येथील इमारतीचा स्लॅब आणि भिंत कोसळल्याची घटना घडल्यामुळे तलाठ्यांनी पंचनामा करून शासनाला कळवावे, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.
इमारतीच्या स्लॅबसह भिंत कोसळली
