। नवीन पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल, सेक्टर 12 येथे एका इमारतीचा भाग अचानक कोसळल्याची घटना बुधवारी (दि.17) घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या बाजूला ही इमारत होती. इमारत कोसळताना रस्त्यावरून कोणीही जात नसल्याने जीवितहानी टळली. या इमारतीत कोणीही राहत नसल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.