कामोठे वसाहतीतील पाणी प्रश्‍न सुटणार

। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे वसाहतीमध्ये पाणी प्रश्‍न भेडसावत होता, यासंदर्भात शिरीष घरत यांनी रायगड भवन येथे पाणी प्रश्‍नावर संबंधीत अधिकार्‍यां बरोबर बैठक घेऊन आम्हास फक्त आश्‍वासन नको रिजल्ट पाहिजे आशी ठाम भुमिका घेतल्यामुळे येत्या दोन दिवसात पाणी प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन संबंधीत अधिकार्‍यानी दिल्यामुळे कामोठे वसाहतीमधील पाण्याचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. संपूर्ण कामोठे शहरामध्ये आणि जास्त करुन सेक्टर 17,18,34,35 आणि 36 येथे गेल्या दोन महिन्यांपासून पाणी प्रश्‍न भेडसावत आसताना कामोठे नोडच्या अधिकार्‍यांकडून हा प्रश्‍न सुटत नसल्याने घरत यांच्या उपस्थितीत अधिकार्‍यां बरोबर एक तास चर्चा झाली आणि येत्या या दोनच दिवसांत पाणी कामोठे मधील नागरिकांना मिळेल अशी ग्वाही अधिकार्‍यांनी दिली. यावेळी बबन गोगावले, संजय जंगम, सचिन त्रिमुखे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version