पाणी योजनेचे भूमिपूजन संपन्न
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या शिरसे-आवळस गावाला जोडणारा उल्हास नदीवरील पुलाच्या बांधकामाचा तसेच जलजीवन मिशन अंतर्गत आवळस गावासाठी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलामुळे वासरे खोंड्यातील खोपोली औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी जाणार्या चाकरमान्यांची आणि विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार असून, आवळस गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे.
आवळस गावाकडील नदीच्या काठावरील मैदानावर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिरसे-आवळस गावादरम्यान उल्हास नदीवरील 3 कोटी 21 लाख 40 हजार रुपये खर्चाच्या पुलाचे तसेच 61 लाख 10 हजार रुपयांच्या आवळस गावसाठीच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच संतोष भोईर, जयेंद्र देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, कर्जत शहर अध्यक्ष अभिषेक सुर्वे, जलजीवन मिशनचे उप अभियंता सुरेश इंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे, शाखा अभियंता अक्षय चौधरी, सचिन करडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संतोष जाधव यांनी केले.
याप्रसंगी हरिश्चंद्र सुर्वे, कुंडलिक शिंदे, रमेश मोरे, अशोक कदम, रवींद्र भोईर, अशोक तरडे, हरिभाऊ कदम, बबन भोईर, हरिश्चंद्र तेरडे, रामदास पार्टे, जनार्दन जाधव, चंद्रकांत जाधव, बच्चू शिंदे, अशोक खेडेकर, संतोष कदम, सुनील कदम, रवींद्र जाधव, कैलास भोईर, चिमण जाधव, दीपक जाधव आदी ज्येष्ठ ग्रामस्थांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.