गत विजेत्या साहेबांना बाहेरचा रस्ता

न्यूझीलंडवरही टांगती तलवार

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

यंदाच्या टी-20 विश्‍वचषकाचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. यावेळी विश्‍वचषकाध्ये 20 संघ खेळत आहेत. त्याचबरोबर सुपर-8 सामन्यांपूर्वी अनेक छोट्या संघांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. विश्‍वचषकाध्ये आतापर्यंत 21 सामने खेळले गेले आहेत. यानंतर एक संघ सुपर-8 शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर आता चॅम्पियन्स इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तानसह 10 संघ बाहेर पडण्याचा धोका आहे. आतापर्यंत या विश्‍वचषकामध्ये इंग्लंड व न्यूझीलंडने एकच सामना खेळला आहे. इंग्लंड ब गटात चौथ्या स्थानावर असून न्यूझीलंड क गटात शेवटच्या स्थानावर आहे. तसेच, पाकिस्तान संघाने दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या पाकिस्तान अ गटात चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय युगांडा, नामिबिया, नेपाळ, आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, श्रीलंका आणि कॅनडा या संघांनाही सुपर-8 शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे.

ओमान सुपर-8 मधून बाहेर
ओमानचा संघही या विश्‍वचषकामध्ये पहिल्यांदाच खेळत होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघांसह ओमानला ब गटात ठेवण्यात आले होते. ओमानने यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत आतापर्यंत 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ओमान सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
गतविजेत्या संघाला बाहेरचा रस्ता?
यंदाच्या विश्‍वचषकामध्ये पाऊस अनेक संघांसाठी खलनायक ठरला आहे. ज्यामध्ये पहिले नाव इंग्लंडचे आहे. इंग्लंडचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर इंग्लंड पुढचा सामना ऑस्ट्रेलियाकडून हरला. आता गतविजेत्याला सुपर-8 शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे. इंग्लंडने 2 सामने खेळले असून ते ब गटात एका गुणासह चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडशिवाय दुसरे मोठे नाव न्यूझीलंडचे आहे.
Exit mobile version