| मुंबई | प्रतिनिधी |
आयपीएल 2023 मध्ये रोमांचक सामने खेळले जात आहेत. आता या हंगामाचा तो टप्पा सुरू झाला आहे, जेव्हा संघ एकमेकांशी स्पर्धा करत आहेत आणि दुसर्यांदा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरत आहेत. प्लेऑफमध्ये जाणार्या चार संघांमध्ये रोमांचक शर्यत रंगणार आहे. काही दिवसांपूर्वी जे संघ अव्वल स्थानावर धावत होते, ते आता खाली आले आहेत, तर तळाचे संघ आपले सामने जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
आयपीएल 2023 च्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर यावेळी आयपीएल 2022 चा चॅम्पियन संघ गुजरात टायटन्स आघाडीवर आहे. संघाने आतापर्यंत केवळ आठ सामने खेळले असून, सहा जिंकले आणि 12 गुण मिळवले आहेत. या संघासाठी आता प्लेऑफची शर्यत खूपच सोपी दिसत आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील एलएसजीचा संघ दुसर्या क्रमांकावर आहे. ज्याने आपल्या आठपैकी पाच सामने जिंकले असून, 10 गुण आहेत. म्हणजेच उर्वरित सहा सामन्यांपैकी संघाला फक्त तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. प्लेऑफमध्येही या संघाचे स्थान जवळपास निश्चित दिसत आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ अजूनही पहिल्या चार क्रमांकामध्ये कायम आहे. संघाने आपले नऊ सामने खेळले असून, पाच सामने जिंकून दहा गुण आहेत. म्हणजेच आता आरआरचे फक्त पाच सामने शिल्लक आहेत. यातील संघाला किमान तीन सामने जिंकावे लागणार आहेत. दुसरीकडे एसएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने नऊपैकी पाच सामने जिंकून दहा गुण मिळवले असून, संघाला पाचपैकी तीन सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील.
या चार अव्वल संघांशिवाय आता पंजाब किंग्जचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. संघाने नऊपैकी पाच सामने जिंकले आहेत आणि त्यांचे दहा गुणही आहेत, परंतु पंजाब किंग्जचा निव्वळ धावगती कमी आहे. दुसरीकडे, आरसीबी सहाव्या क्रमांकावर आहे. संघाने आठपैकी चार सामने जिंकले असून त्यांचे आठ गुण आहेत. म्हणजेच आरसीबीला उर्वरित सहा सामन्यांपैकी किमान चार सामने जिंकावे लागतील. अन्यथा त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल.
मुंबई इंडियन्सचा संघही आता प्लेऑफसाठी दावेदारी करताना दिसत आहे. संघाने आठपैकी चार सामने जिंकले असून, आठ गुण आहेत. म्हणजेच त्यालाही उर्वरित सहा सामन्यांपैकी किमान चार सामने जिंकावे लागतील. केकेआर, सनराईज हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या तिन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत टॉप 4 मध्ये पोहोचणे खूप कठीण आह