पतीला कंटाळून पत्नीने(डॉक्टर) संपवले आयुष्य

| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |

छत्रपती संभाजीनगर येथे एका डॉक्टर महिलेने पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. प्रतिक्षा प्रीतम गवारे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिक्षाने सात पानी चिठ्ठी लिहून आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली. चिठीमध्ये तिचा नवरा तिला आपल्या चारित्र्यावर सतत संशय कसा घेत होता, याबद्दलही सांगितले आहे. तसेच हुंडा आणि फर्निचरसाठी त्याने सतत तगादा लावला होता. जगणे नकोसे करून सोडले होते त्‍यामुळे तीने अत्‍माहात्‍या केली हे चिठ्‌ठीमध्ये लिहीले आहे असे दिसून येत आहे. प्रकरणी प्रतिक्षाने व वडीलांनी पतीविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रीतम शंकर गवारे असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version