छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचा पनवेल मनपातर्फे सन्मान

। पनवेल । वार्ताहर ।
महानगरपालिकेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ङ्गरंग पनवेलचेफ या संकल्पने अंतर्गत मुंबईचे महाद्वार पनवेल, बदलतं पनेवल माझं पनवेल, मायानगरीचे महाद्वार आमचं पनेवल या विषयांवर हौशी, व्यवसायिक व पालिका कर्मचारी छायाचित्रकारांसाठी महापालिकेने छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील हौशी व व्यवसायिक छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडून करण्यात आले होते. या स्पर्धेला पालिका क्षेत्रातील छायाचित्रकार स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील विजेत्यांना नुकत्याच झालेल्या महासभेत पारितोषिकांचे वितरण करून सन्मान करण्यात आला. या स्पर्धेतील व्यवसायिक गटामधील विजेते भालचंद्र जुमलेदार, लक्ष्मण ठाकूर, अनिकेत गावडे, हौशी गटामधील विजेते साहील रेळेकर, रूपाली देवकर, तेजेस चांडक आणि कर्मचारी गटातील विजेते डॉ. तेजेस पाटील, स्वप्नाली चौधरी, सौरभ पाटील यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रुपये पाच हजार रुपयांचे पारितोषिक महापौर डॉ.कविता चौतमोल, विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Exit mobile version