पोलिसाच्या सतर्कतेमुळे महिला प्रवाशाचे प्राण वाचले

। नेरळ । प्रतिनिधी ।
सोलापूर ते मुंबई दरम्यान धावणार्‍या पॅसेंजर गाडीतून उतरताना खाली पडून जखमी झालेल्या एका रेल्वे महिला प्रवाशाचे प्राण वाचविण्यात कर्जत स्थानकावरील सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. भाग्यश्री दाभाडे असे या जखमी महिलेचे नाव आहे. करमाळा येथील भाग्यश्री दाभाडे ही तरुणी कर्जत स्थानक सोलापूर- मुंबई एक्स्प्रेस गाडीने येत होत्या. स्थानकात ती एक्स्प्रेस गाडी काहीशी धिमी झाली. गाडी थोडी स्लो झाल्यावर अचानक गाडी सोडावी असे वाटल्यावर त्या तरुणीने चालती गाडी सोडण्याचा प्रयत्न केला.मात्र रेल्वे गाडीच्या स्पीडचा अंदाज न आल्याने त्या भरकटल्या आणि गाडीच्या खाली आल्या.

त्यावेळी झालेल्या अपघातात त्या तरुणीच्या हातावरून गाडी चाक गेले तसेच डोक्याला देखील मार लागला होता.त्याबाबत माहिती कर्जत रेल्वे स्थानकातील कर्जत रेल्वे स्थानकात मिळताच आणि आरपीएफ जवान आणि पोलीस यंत्रणेचे रेल्वे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक घोलप तसेच होमगार्ड अंजुम कदम,भरत लोहकरे, केतन लोखंडे, रोशन बुरुड, दशरथ जाधव,प्रेरणा भालेराव यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या तरुणीला तातडीने धावत पळत स्ट्रेचरवर ठेवून कर्जत बाजारपेठेतून वाट काढीत तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. रामदास तडपेवार आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य पथकाने भाग्यश्री दाभाडे या तरुणीला वाचविण्यासाठी उपचार करीत शर्थीचे प्रयत्न केले. त्या तरुणीवर कर्जत येथे प्रथमोपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले.

Exit mobile version