। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील स्टेशन ठाकूर वाडी येथे थांबलेल्या मेल एक्स्प्रेस ट्रेनमधून अज्ञात व्यक्तीने प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण खेचून नेले आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत स्टेशन ठाकूरवाडी येथे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर गाडी नंबर 22158 अप चेन्नई मुंबई सुपर फास्ट मेल गाडीच्या एस-4 बोगीच्या बर्थ नंबर 51 वरुन गाडी ठाकुरवाडी रेल्वे स्टेशन येथे थांबली होती. त्यावेळी अंबरनाथ येथील महिला प्रवासी आपल्या कुटुंबियांसह गाडी नंबर 22158 अप चेन्नई मुंबई सुपर फास्ट मेल गाडीच्या एस-4 बोगीच्या बर्थ नंबर 51 मध्ये झोपून प्रवास करीत होते. ही गाडी ठाकुरवाडी रेल्वे स्टेशन येथे थांबली असताना बाहेरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने खिडकीतून हात घालून त्या महिला प्रवासी यांच्या गळ्यातील एकूण 1,85,000/-रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचून तोडून चोरुन घेऊन गेला. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.